Wedding Anniversary Wishes : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात द्या शुभेच्छा!

admin

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा दिवस खूप खास असतो. जो दरवर्षी जोडप्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लग्नाचा वाढदिवस विवाहित जोडप्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो जितका एखाद्याचा वाढदिवस असतो. अशा परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला मित्र, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला तुमच्‍या पती-पत्नी किंवा नातेवाईकांसाठी काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाहणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांनाही पाठवू शकता…

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्याची परंपरा आली कुठून? (Where Did The Traditional Anniversary Gifts Come From?)

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त भेटवस्तू देण्याची कल्पना प्राचीन रोम किंवा मध्ययुगीन जर्मनीमधून आल्याचे काही दाखले आढळतात. परंतु, त्यापूर्वीच्या परंपरेसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळणे कठीण आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देण्यासाठी सर्वोत्तम गिफ्ट कोणते? (What Is Best Gift For Marriage Anniversary?)  

लग्नाचा वाढदिवस हा कोणत्याही कपल्ससाठी एक खास आणि अविस्मरणीय दिवस असतो. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शुभेच्छाच्या स्वरुपात गिफ्ट देण्याची परंपरा आपल्याकडे पाहायला मिळते. सोप्या शब्दांत सांगायचे तर या प्रसंगी प्रेमाने दिलेली कोणतीही गोष्ट कपल्सचा आनंद द्विगुणित करणारी ठरेल. पण, गिफ्ट देण्यापूर्वी थोडा विचार करा. त्यांच्या आवडी निवडीनुसार तुम्ही गिफ्टची निवड करु शकता. पुष्पगुच्छ, चॉकलेट्स, घर सजावटीची एखादी सुंदर वस्तू, फोटो फ्रेम यासारख्या वस्तू लग्नाच्या शुभेच्छा देताना सर्वोत्तम ठरतील. 

Instagram/Karishma Tanna Bangera

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात द्या शुभेच्छा! (Wish you a special wedding anniversary!)

एक स्वप्न तुमच्या दोघांचे 

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याचा अनमोल क्षण

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. 
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुंगिधत राहावं हे आयुष्य

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा : Marriage Tips: मुलगी-मुलगा लग्नासाठी तयार नसेल तर हा 'सल्ला' पालकांसाठी

लग्न म्हणे स्वर्ग

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!

सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sources : Internet

सुगंधित व्हावं तुमचं जीवन

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

नात्याने स्पर्श करावे नवे आकाश

देव करो असाच येत राहो,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Sources : Internet

प्रेमापासून विश्वासांपर्यंत

घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हेही वाचा : लग्नाच्या सिझनसाठी ट्राय करा खास स्टाईल; पाहा ऐश्वर्या रायचे सुंदर अनारकली लूक्स

आपुलकी आणि ममता

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

विश्वासाची गाथा 

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

Sources : Internet

अजुन पालवी फुटू दे

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

हेही वाचा - न्यूड लिप्स आणि सुंदर स्मोकी डोळ्यांसह हिरव्या ड्रेसमधील हिना खानचा भन्नाट लूक

तुमची जोडी कायम राहो

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sources : Internet

तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो

आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

हेही वाचा - दीपिकापासून आलियापर्यंत, बॉलिवूड अभिनेत्रींसारखे खास आउटफिट्स; तुम्हीही खरेदी करू शकता

नात्यातले आपले बंध

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा दोघांचं प्रेम

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Sources : Internet

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.हेही वाचा : तुमच्या सुंदर लूकसाठी जबरदस्त अनारकली सूट; करिश्मापासून सोनमपर्यंत सर्वांचेच आहेत फेवरेट


सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sources : Internet

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

हसत राहा येवो कोणताही क्षण

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.

प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो

स्वप्नं तुझं पूर्ण होवो
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear.

एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो

आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

हेही वाचा : Sangeet Dress For Bride : संगीत कार्यक्रमासाठी 'हे' आहेत वधूकरता जबरदस्त आऊटफिट

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल काही प्रश्न असल्यास, आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद होईल. तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.